धुळे | प्रतिनिधीमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज असताना, शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्थिती अत्यंत दयनीय आणि अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या वतीने शिक्षण विभागाला कडक शब्दांत निवेदन देण्यात आले.विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यातशाळा-महाविद्यालयांमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ, गाळ आणि घाण साचली आहे. टाक्यांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून तिथे डास आणि जंतूंचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना टायफॉइड, कॉलरा आणि गॅस्ट्रो यांसारख्या जलजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही शाळा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.२४ ते ४८ तासांचा अल्टिमेटमशिक्षण विभागाने तात्काळ संबंधित शाळांची पाहणी करून येत्या २४ ते ४८ तासांच्या आत सर्व टाक्यांची स्वच्छता करावी आणि विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर विहित मुदतीत स्वच्छता झाली नाही आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या आरोग्यास हानी पोहोचली, तर त्याला शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.युवासेना स्टाईलने आंदोलनाचा इशाराप्रशासनाने या विषयावर कठोर कारवाई न केल्यास ‘शिवसेना-युवासेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांनी दिला आहे.यावेळी उपस्थित पदाधिकारी:हे निवेदन देताना युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश मराठे, शहराध्यक्ष अमित खंडेलवाल, उपशहरप्रमुख चेतन धामेचा, दत्ता शिंदे, अनिल ठाकूर, जावेद बेग, भूषण पाटील, दिगंबर कासार, देवेंद्र गायकवाड, सुमित चौधरी, नितीन धनगर, राहुल ठाकूर, आदेश मराठे, शुभम पाटील, प्रवीण मराठे आदी शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.









