राजकीय दबाव झुगारून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते ‘ॲक्शन मोड’मध्ये; आरोग्य विभागात मोठी खळबळ
धुळे | विशेष प्रतिनिधीशहरातील क्षयरोग निवारण केंद्राबाबत (TB Center) प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी काल अचानक धाड टाकली. या धडक कारवाईत केंद्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून, कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप गजरे यांच्यासह गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे धाडसी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले आहेत.नेमकी कारवाई काय?गेल्या अनेक दिवसांपासून या केंद्राच्या कामकाजाबाबत आणि तेथील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा वाचला होता. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर धडक दिली. यावेळी त्यांना तिथे अस्वच्छतेचे साम्राज्य आणि नियोजनाचा पूर्णतः अभाव दिसून आला. धक्कादायक बाब म्हणजे, कर्तव्यावर असणे अपेक्षित असताना अनेक कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळले.राजकीय वरदहस्त मोडित काढलाया केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना यापूर्वीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, राजकीय दबाव आणि ‘वरदहस्ता’चा वापर करून हे कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याची चर्चा धुळ्यात सुरू होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट कारवाईमुळे राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या ‘लाडक्या’ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासकीय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून मिळाला आहे.कठोर पाऊले आणि निलंबनपाहणी दरम्यान समोर आलेली गंभीर परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहेत:निलंबन: वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप गजरे यांच्यासह गैरहजर

कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश.कारणे दाखवा नोटीस: अन्य चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.स्वच्छता: केंद्रात तत्काळ स्वच्छता राखण्याबाबत आरोग्य विभागाला कठोर सूचना.नागरिकांकडून स्वागतसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि राजकीय आडोसा घेणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला हा ‘दणका’ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारात या कारवाईमुळे कायमस्वरूपी सुधारणा होईल, अशी आशा आता धुळेकर व्यक्त करत आहेत.








