धुळे (सनी सोनवणे, धुळे ):
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथील कर्तव्यदक्ष व उपक्रमशील प्राचार्य श्री. प्रवीणकुमार लाडे सर यांची धुळे शहर मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी स्तुत्य निवड करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणारे लाडे सर हे आपल्या अभ्यासू वृत्तीसाठी, शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी आणि विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जातात. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून व शिक्षक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला जात आहे.
धुळे शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवणे, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी नवे उपक्रम राबवणे आणि शिक्षकांच्या अडीअडचणींना न्याय मिळवून देणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे लाडे सर यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना सांगितले.
त्यांच्या या बिनविरोध व स्तुत्य निवडीबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, समाजधुरंधर तसेच नातेवाईक व मित्रांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.







