सायगाव येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड; संघटना बळकटीकरणासाठी काम करण्याचे बाबासाहेब बोरसे यांचे आवाहन
चाळीसगाव ( नासिर मुल्ला ): आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायगाव येथे चाळीसगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. बाबासाहेब बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. उमाताई बाबासाहेब भिल्ल बोरसे यांच्या उपस्थितीत आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मा. दिलीपभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी चाळीसगाव तालुका प्रमुखपदी मादुर्णे येथील दगडू वसंत सोनवणे यांची निवड करण्यात आली. महिला तालुका प्रमुखपदी सायगाव येथील सुरेखा संजय सोनवणे, उपतालुका प्रमुखपदी भोरस येथील गोकुळ भिल्ल, महिला तालुका उपप्रमुखपदी नांदगाव येथील मंगलताई सोनवणे, तर महिला मुख्य सदस्यपदी नांदगाव येथील रूपाबाई सोनवणे यांची निवड जाहीर करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत
नवीन पदाधिकाऱ्यांना पदभार देताना सायगाव येथील आनंद सोनवणे, अविनाश सोनवणे, प्रतीक सोनवणे, वैभव सोनवणे, इक्बाल पठाण, सिंधुताई सोनवणे, अक्काबाई दळवी, कमलाबाई भिल्ल, भुरयबाई भिल्ल, झिंगाबाई सोनवणे, मिराबाई सोनवणे, मंगलबाई सोनवणे, अजिंक्य सोनवणे, धर्मा सोनवणे व दुपाबाई सोनवणे उपस्थित होते. तसेच सायगावच्या सरपंच कमलाबाई माळी, मादुर्णे येथील प्रकाश लहु माळी, बबन भिल्ल, संभाजी भिल्ल, वाल्मिक भिल्ल, पिंजारपाडा रामनगर येथील विनोद भिल्ल, सुरेश भिल्ल, गुलाब भिल्ल यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनावाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेची ध्येयधोरणे स्वीकारून आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी कार्य करावे आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी जोमाने काम करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब बोरसे यांनी यावेळी केले.








