धुळे (सनी सोनवणे ):
धुळे शहरातील जलसिंचन सोसायटी परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) राजकुमार उपासे यांच्या पथकाने टाकलेल्या या छाप्यात ६४ हजार रुपयांच्या बनावट दारूसह, दारू बनवण्याचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धुळे शहरातील जलसिंचन सोसायटी भागात एका ठिकाणी बेकायदेशीररीत्या बनावट देशी दारू तयार करून तिची साठवणूक व विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दारू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि साठा आढळून आला. या छाप्यात पोलिसांनी ६४ हजार रुपये किमतीची बनावट देशी दारू आणि दारू बनवण्याचा साठा.गुन्ह्यात आणि दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी सेंट्रो (Santro) कंपनीची चारचाकी गाडी.

जप्त करण्यात आलेली दारू, साहित्य आणि वाहन असा एकूण मिळून अंदाजे २ ते 3 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कारवाईतील सहभागी अधिकारी:
ही यशस्वी आणि धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) श्री. राजकुमार उपासे आणि केरले मॅडम यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.








