५ मोबाईलसह मुद्देमाल हस्तगत, सराईत गुन्हेगार गजाआड
धुळे (सनी सोनवणे):
देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातून रोकड व ५ मोबाईल लांबवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १ लाख १ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल हस्तगत करण्यात देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री ११:३० ते २० ऑक्टोबर २०२६ च्या पहाटे ३:०० वाजेच्या दरम्यान, फिर्यादी श्री. आझम मोहम्मद फाजिल पठाण (रा. मोहम्मदी मशिदीजवळ, देवपूर, धुळे) यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने १०,००० रुपये रोख रक्कम आणि ५ मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३३/२०२६ BNS कलम ३०५, ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
गुन्ह्याचा तपास करत असताना, देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. प्रतापसिंग मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे सराईत गुन्हेगार तौसिफ उर्फ पापा भिकन तांबोळी (वय २२ वर्षे, रा. नेहरू नगर, मास्तरवाडी, देवपूर, धुळे) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
१,०१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
संशयित आरोपीकडून खालीलप्रमाणे विविध कंपन्यांचे ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत:
वन प्लस मोबाईल: ₹४०,०००/-
व्हिव्हो मोबाईल: ₹२५,०००/-
व्हिव्हो मोबाईल: ₹२०,०००/-
ओप्पो मोबाईल: ₹१०,०००/-
रेडमी मोबाईल: ₹६,०००/-
एकूण हस्तगत मुद्देमाल: ₹१,०१,०००/-
पूर्वइतिहास असणारा सराईत गुन्हेगार
पोलीस तपासात समोर आले की, आरोपी तौसिफ उर्फ पापा भिकन तांबोळी याच्याविरुद्ध यापूर्वीही घरफोडी आणि चोरीचे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी
ही धडक कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सपोनि. प्रतापसिंग मोहिते (प्रभारी अधिकारी), पोलीस अंमलदार मिलिंद सोनवणे, किरण मेहरुणकर, महेंद्र भदाणे, भटेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, नितीन चव्हाण, वसंत कोकणी, सौरभ कुटे व शुभम बोरसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देवपूर पोलिसांच्या या जलद कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.








