धुळे (लोकन्याय न्यूज):साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीच्या टॉवरमधून कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची केबल आणि गुन्ह्यात वापरलेली ईको गाडी असा एकूण ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय?
७ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास फोकादे गावच्या शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवर क्रमांक जे-३१ मधून २४० स्क्वेअर एम.एम. ची ३६० मीटर कॉपर केबल चोरट्यांनी लंपास केली होती. या चोरीच्या केबलची किंमत साधारण ३ लाख ६० हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे फिरली आणि आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि मयूर भामरे यांनी गुप्त माहिती आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे तपासाला गती दिली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत खालील ६ जणांना ताब्यात घेतले:
१) फैजान रज्जाक खाटीक (रा. जैताणे)
२) सुकदेव आनंदा कोळी (रा. राजाळे)
३) अल्तमश शौकत सय्यद (रा. निजामपूर)
४) दिपक पंडीत सोनवणे (रा. दुसाणे)
५) पावबा राजु भिल (रा. दुसाणे)
६) करण राजु मोरे (रा. दुसाणे)
न्यायालयाने या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ईको गाडी (क्र. जीजे-०५ आर.जे.-९७२७) जप्त करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (साक्री) एस.आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि मयूर भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि मधुकर सोमासे, यशवंत भामरे यांच्यासह कर्मचारी नारायण माळवे, रतन मोरे, प्रशांत ठाकुर, प्रदीप आखाडे, खंडेराव पवार, सुजीत देवरे, सुनिल अहिरे, परमेश्वर चव्हाण, प्रवीण पवार, राकेश महाले, गौतम अहिरे, मुकेश दुरगुडे, टिलु पावरा, श्रीराम पदमर आणि मोहन माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.








