मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दत्तात्रय देवगावकर यांच्या कामकाजाबाबत आणि प्रशासकीय निर्णयांबाबत वरिष्ठ स्तरावर काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कर्तव्यातील कसूर आणि विविध प्रशासकीय अनियमितता यांसारख्या वेगवेगळ्या कारणांवरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या निलंबनामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील कारभार आणि रुग्णांच्या तक्रारी यांमुळे हे कार्यालय चर्चेत होते. आता नवीन नियुक्तीनंतर रुग्णालयाच्या कामकाजात काय सुधारणा होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








