धुळे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भीम नगर भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने विद्यावर्धनी कॉलेजच्या मैदानावर भव्य ‘१४ एप्रिल नाईट चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन डीवायएसपी (DySP) पोलीस अधिकारी उपासणे सर, शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक भू-वैज्ञानिक अधिकारी रष्मा शिंदे आणि नगरसेविका पूनम शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी मैदानावर नारळ फोडून आणि कॉईन टॉस करून स्पर्धेची अधिकृत सुरुवात केली.

आकर्षक पारितोषिके आणि संघांचा प्रतिसाद
या भव्य स्पर्धेत एकूण ३२ नामांकित संघांनी सहभाग नोंदवला आहे. विजेत्या संघांसाठी समितीने भरघोस बक्षिसे ठेवली असून, खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पारितोषिकांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
प्रथम पारितोषिक: ७१,००० रुपये रोख
द्वितीय पारितोषिक: ४१,००० रुपये रोख
तृतीय पारितोषिक: १५,००० रुपये रोख
चतुर्थ पारितोषिक: १०,००० रुपये रोख
पाचवे पारितोषिक: ५,००० रुपये रोख

नियोजनाची सर्वत्र प्रशंसा
भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने मैदानावर करण्यात आलेले प्रकाशझोत (Floodlights) आणि खेळाडूंसाठीच्या सोयीसुविधांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तम नियोजनामुळे खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला असून क्रिकेट प्रेमींची देखील मोठी गर्दी उसळत आहे.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, धनराज शिरसाठ, सुनील वानखेडे, भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गुड्डू शिरसाठ, जयपाल गिरासे, किरण ढिवरे यांसह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





