महिलांसाठी बचत गट आणि मोफत आरोग्य सेवेचे विजय गोरे यांचे आश्वासन
धुळे:वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ‘वडार भवन’ उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गोरे यांनी केली आहे. ते धुळे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

महिला सक्षमीकरण आणि रोजगार महिला वर्गाला संबोधित करताना गोरे यांनी बचत गटांच्या स्थापनेवर भर दिला. ते म्हणाले:महिलांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त बचत गट तयार करावेत.या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.महिलांसाठी पेन्शन आणि शासनाच्या इतर सवलती मिळवून देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाईल.वडार भवन आणि मोफत आरोग्य सेवा समाजातील आरोग्य व्यवस्थेवर बोलताना त्यांनी सांगितले की, समाजात अनेकांना कॅन्सर आणि टीबी (क्षयरोग) यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, परंतु पैशांअभावी त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाहीत.

यावर उपाय म्हणून:फाउंडेशनतर्फे गरजूंना मोफत आरोग्य सेवा आणि शंभर टक्के मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल.जिल्ह्यात लवकरच ‘वडार भवन’उभारले जाईल.आपत्कालीन परिस्थितीसाठी या वडार भवनात कायमस्वरूपी एक मोफत ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध असेल.रायगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा
यावेळी गोरे यांनी समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा दाखला दिला. ते म्हणाले की, रायगड किल्ला बांधताना हिरोजी यांनी स्वतःची जमीन विकली होती. तिथे वापरल्या गेलेल्या दगडाला ‘राय’ असे म्हणतात. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जेव्हा हिरोजींना काय हवे असे विचारले, तेव्हा त्यांनी या किल्ल्याला ‘रायगड’ नाव देण्याची विनंती केली आणि महाराजांनी ती मान्य केली. हा इतिहास काही समाजकंटकांनी दडपून ठेवला होता, तो आपण शोधून काढला असून हा खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमाला वीर वडार एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गोरे यांच्यासह भैय्या लष्कर, सागर लष्कर, संजय कुसळकर, प्रवीण बाविस्कर, भूषण ठाकरे, लक्ष्मण विटेकर, गणेश धोत्रे, बापू गुंजाळ, सागर कुसळकर, सुरेश मंजुळकर आणि मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.








