धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून साक्री रोडवरील भीमनगर येथे ‘भीम जयंती उत्सव समिती’ची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. या समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण (गुड्डू) शिरसाठ यांची, तर उपाध्यक्षपदी विनायक इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कार्यसम्राट माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिरपूर येथील सुनीलभाऊ वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. आगामी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
उत्सव समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली:
उपाध्यक्ष: विनायक इंगळे
अध्यक्ष: प्रवीण (गुड्डू) शिरसाठ
कार्याध्यक्ष: संतोष (आबा) बागुल
सचिव: विकी बैसाने
खजिनदार: निलेश जिरे
प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक:
या निवडीप्रसंगी कोर कमिटीचे अध्यक्ष धनराज शिरसाठ, किरण धिवरे, डॉ. सुभाष सोनवणे, संजय सरदार, भैया पटाईत, राजू साळवे, नरेंद्र सरदार, समर्पित मोरे, हिम्मत अहिरे, भैय्या सरदार आणि देवा पवार यांच्यासह भीमनगर मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, समस्त भीमनगर मित्र मंडळाने यावर्षीची भीम जयंती ऐतिहासिक स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प केला आहे.



